चंद्रपूर: बहुजन समाज पार्टीतर्फे घुग्गुस येथे शहर अध्यक्ष सिध्दार्थ कोंडगुर्ले यांच्या घरी बैठक
बहुजन समाज पार्टी चंद्रपूर विधानसभे अंतर्गत आगामी निवडणूकी संदर्भात घुग्गुस शहरात आज दि.21 सप्टेंबर ला 12 वाजता घुग्गुस शहर अध्यक्ष मा. सिध्दार्थ कोंडगुर्ले यांच्या घरी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीचे अध्यक्षपद प्रा. डॉ. लाडे यांनी तर प्रमुख मार्गदर्शक चंद्रपूर जिल्ह्याचे संगठक संतोष साखरकर यांनी प्रेरणात्मक मार्गदर्शन केले.