अक्कलकुवा: कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकुवा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
अक्कलकुवा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमश्या पाडवी यांचा हस्ते ध्वजारोहण दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच अक्कलकुवा शहरातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.