रामटेक: खिंडसी (रामटेक)व पेंच (पारशिवनी) जलाशयात आता होणार झिंग्याचे उत्पादन; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तलावात सोडले झिंगे
Ramtek, Nagpur | Mar 21, 2026 रामटेक तालुक्यातील खिंडसी जलाशय व पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयातील मासोळी आपल्या वेगळ्या चवीसाठी फार प्रसिद्ध आहे. या जलाशयात आता भर पडली आहे ती राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी शनिवार दिनांक 21 मार्चला सोडलेल्या झिंगा बिजाई ची. या दोन्ही तलावात आता झिंग्याचे उत्पादन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आता झिंगा व्यावसायिक व झिंगा प्रेमी यांच्यात हर्ष व्यक्त होत आहे. यामुळे रोजगारा सह रामटेकला नवीन ओळख मिळणार आहे.यात 7 लाख 60हजार रु चे तब्बल 4 लाख झिंगे सोडण्यात आले आहेत.