परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याने आता पाळीव प्राण्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. झिलपा येथील रहिवासी मोंटू डहाके यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोंटू डहाके यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास झडप घातली.