अवैध मुरूम उत्खननवर घाटसावळी येथे महसूल विभागाची कारवाई
बीड महसूल विभागाने घाटसावळी शिवारात अवैध मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती मिळाली असता विनापरवाना मुरूम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत एक पोकलेन, एक हायवा आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे. नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी कंपनीसह चालक व मालकांविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.