यश ढाका या तरुणाची हत्या केल्या प्रकरणात चौघा जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Beed, Beed | Sep 27, 2025 एसपी ऑफीसपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अतिशय वर्दळीच्या माने कॉम्पलेक्स परिसरात यश देवेंद्र ढाका या २२ वर्षीय तरूणाची निघृणपणे हत्या झाल्याची घटना घडली. सदरील घटनेने पोलीस प्रशासनाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आला असून राजकीय पाठबळाच्या आडून एका सर्वसामान्य पत्रकाराच्या मुलाचा जीव गेला आहे. विशेष म्हणजे सुरूवातीला पोलीसांनी या प्रकरणात एकच मारेकरी असून त्याला ताब्यात घेतल्याचे सांगितले होते. या प्रकरणात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.