सातारा: शेतकरी-व्यापारी समन्वयातूनच बाजार समित्यांचा विकास –बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
Satara, Satara | Oct 18, 2025 शेतकरी आणि व्यापारी हे बाजार समितीचे खरे आत्मा असून, त्यांच्यात योग्य पद्धतीने समन्वय निर्माण झाल्यासच बाजार समित्येचा आणि त्यासोबत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खऱ्या अर्थाने विकास होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. खिंडवाडी (सातारा) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वर्गीय श्री. छ. अभयसिंहराजे भोसले व्यापार संकुल उपबाजार भव्य इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला.