अंजनगाव सुर्जी: “ज्योतीबांची सावली सावित्री माऊली” नाटकाचा ४९ वा प्रयोग स्व.महादेवराव ठाकरे सभागृहात सादर
स्त्रीशिक्षण, समाजजागृती आणि समानतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या “ज्योतीबांची सावली सावित्री माऊली” या तत्कालीन परिस्थितीवर आधारित संघर्षमय नाटकाचा ४९ वा प्रयोग अंजनगाव सुर्जी येथील स्व.महादेवराव ठाकरे सभागृहात आज सायं ७ वाजता सादर करण्यात आला.तेजांकुर बहुद्देशीय संस्था,परतवाडा प्रस्तुत नाटकाचे सादरीकरण जेसीआय अंजनगाव द्वारा आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष देविदास नेमाडे यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मोहन काळे,.डॉ.विलासराव कविटकर उपस्थित होते.