जालना: स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त; विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
Jalna, Jalna | Jun 13, 2026 जालना स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. शनिवार दि. 13 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरांचा शोध घेत असताना त्यांना चोरी गेलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल (क्र.एमएच.-14-एचजे-0479) जप्त केली आहे.