उत्तर सोलापूर: ग्रामीण पोलीसांची कामगिरी उल्लेखनीय: विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे कौतुक...
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंगळवारी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा आढावा घेतला व मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त पासलेवाडी येथे पाहणी करून नागरिकांना मार्गदर्शन तसेच मदत साहित्य वाटप केले. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अलीकडील काळात अनेक महत्वाच्या कारवाया केल्या. एकूणच, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने कायदा-सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांवर कारवाई व सामाजिक जबाबदारी पार पाडण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.