पुर्णा: तालुक्यातील मौजे मरसुळ येथे दहा फुट लांबीचा महाकाय अजगर अढळला
Purna, Parbhani | Oct 28, 2025 पूर्णा तालुक्यातील मौजे मरसुळ शिवारात सोमवार 27 ऑक्टोबर रोजी रात्री तब्बल दहा फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली. शेतकरी रावसाहेब मोहनाजी कदम यांना त्यांच्या शेतातील कालव्याजवळ हा महाकाय अजगर दिसला, सरपंच गणपत शिंदे यांनी नांदेड येथील प्रसिद्ध सर्पमित्र रघुवीर बकाल व विशाल गिरी यांना तातडीने फोन करून मदतीस बोलावले. सर्पमित्र रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मरसुळ येथे दाखल झाले आणि थरारक कारवाई करत मोठ्या शिताफीने अजगराला सुरक्षितरीत्या पकडण्यात यश मिळवले.