प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारतर्फे महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल दिल्या जाणाऱ्या 'गुणवत्तापूर्ण सेवा पदक' ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर ग्रामीण पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये पराग बाबुराव पोटे उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल उपविभाग आणि कैलास रामजी बारभाई पोलीस निरीक्षक, बिनतारी संदेश विभाग यांचा समावेश आहे.