राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ साठी नशिराबाद येथील गट क्र. २२०६ मधील भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम हडप करण्यासाठी एका ५८ वर्षीय महिलेने नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत शासनाची तब्बल १६ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नायब तहसीलदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.