वणी: लिंक वर टच करताच खात्यातील 92 हजार 186 रुपयाचे रक्कम गायब, वणी शहरातील घटना शहर पोलिसात तक्रार दाखल
Wani, Yavatmal | Oct 22, 2025 मीना पाटील यांनी पोलिस निरीक्षक, वणी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना बजाज फायनान्सकडून वैयक्तिक कर्ज मंजूर झाल्याचे सांगत काही संशयास्पद व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला “बजाज फायनान्स शाखा वणी" येथील अधिकारी असल्याचे सांगून बँक तपशील, आधार क्रमांक, पॅन क्रमांक मागवला. विश्वासात घेऊन माहिती दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून एकूण ₹92186 इतकी रक्कम काही क्षणांतच गायब झाली.