अकोला: अकोट फाईलमध्ये मोठी जुगार कारवाई; १२ आरोपी ताब्यात, अंदाजे १,०४,२०० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त
Akola, Akola | Sep 14, 2025 ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अकोट फाईल परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जुगारावर कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे महेबुबनगर, नायगाव आणि अकोट फाईल येथील मोकळ्या जागेत ५२ ताशच्या हारतजित जुगाराचे आयोजन करणाऱ्या १२ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ मोबाईल, १०,२०० रुपये रोख आणि एकूण अंदाजे १,०४,२०० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९ वाजता प्रसिध्दी प्रमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली.