बनावट इंस्टाग्राम आयडीच्या माध्यमातून एका विवाहित महिलेशी ओळख वाढवून तिची ४,२४,५५९ रुपयांनी फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना नागपूर सायबर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.अज्ञात आरोपीने फिर्यादी महिलेला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख निर्माण केली. आरोपीने त्याच्या युनियन बँकेतील गोठवलेल्या रक्कमेतून १३ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. यासाठी वेगवेगळी कारणे सांगून त्याने महिलेकडून वेळोवेळी एकूण ४,२४,५५९ रुपये उकळले.