ठाणे: ठाणे स्टेशन परिसर दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकाचा समाजसेवक संगम डोंगरे यांनी उतरवला माज
Thane, Thane | Sep 28, 2025 ठाणे स्टेशन परिसरात दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकाचा समाजसेवक संगम डोंगरे यांनी माज उतरवला आहे. ठाणे स्टेशन परिसरात काही रिक्षाचालक प्रवाशांकडून अडीचपट भाडे आकारात होते. संगम डोंगरे यांनी विरोध केला होता. मात्र सदर रिक्षाचालकाने दादागिरी केली होती. अखेर संगम डोंगरे यांनी आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी रात्री 12 च्या सुमारास सदर रिक्षा चालकाचा माज उतरवला असून सदर रिक्षा चालकाने माफी देखील मागितली आहे.