रोहा: नागोठणे जैन धर्मशाळेत पुजाऱ्याची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट,
Roha, Raigad | Oct 28, 2025 रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे स्थानिक जैन धर्मशाळेत एका पुजाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मयूर कुमार महेशभाई राठवा, वय 23 राहणार वालपरी, तालुका बारडोली, जिल्हा छोटे उदयपूर (राजस्थान) असा मृत व्यक्तीची माहिती समोर आली आहे. तो दहा दिवसांपूर्वी रायगडमधील नागोठणे जैन मंदिरात कामानिमित्त आला होता.घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.धर्मशाळेच्या तिसऱ्या मजल्यावर फॅनला दोरी बांधून त्याने आत्महत्या केली.