चंद्रपूर: नियोजन भवन येथे पालक सचिवांनी घेतला जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा
जिल्ह्यातील पायाभुत कामे आणि प्रमुख प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या उपक्रमांची सोडवणूक करण्यासाठी अपर मुख्य सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकसचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना दिल्या. नियोजन भवन येथे आज दि 13 नोव्हेंबर ला 12 वाजता झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य वनसंरक्षक रामानुजम, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.