चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आणि जनप्रतिनिधींचा राजशिष्टाचार पाळण्यात होत असलेल्या दुर्लक्षाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दि 18 नोव्हेंबर ला 12 वाजता थेट महानगरपालिका गाठून जाब विचारला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी आपल्या समर्थकांसह महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात धडक देत त्यांना घेराव घातला आणि प्रोटोकॉल भंगासह निधी वाटपातील भेदभावावर जाब विचारला.