दर्यापूर: धनंजय लॉजजवळ झालेल्या राजेश इंगळे यांच्या खुनाचा ४८ तासांत उलगडा;१८ वर्षीय आरोपीस अटक
दर्यापूर-अमरावती मार्गावरील तहसील कार्यालयासमोर असलेल्या धनंजय लॉजजवळ सोमवार (२५ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी झालेल्या राजेश इंगळे खुनाच्या प्रकरणाचा उलगडा अवघ्या ४८ तासांत करण्यात दर्यापूर पोलिसांना यश आले.या प्रकरणातील मुख्य आरोपी ओम देशमुख (वय १९, रा.तहसील कार्यालयासमोर, दर्यापूर) याला पोलिसांनी काल मध्यरात्री २:३० वाजता अटक केली.मृत राजेश इंगळे आणि आरोपी ओम देशमुख यांच्यात शाब्दिक वाद झाला होता म्हणून संतापाच्या भरात आरोपीने पाठीमागून लाकडी काठीने इंगळे यांच्या डोक्यावर वार केला.