आष्टी तालुक्यातील कऱ्हेवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळासाहेब आश्रुबा सांगळे हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे शेतीकाम करत असताना अचानक विद्युत तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. त्यातच विजेचा जबर धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे सांगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी तत्काळ कऱ्हेवाडी येथे जाऊन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.