२० डिसेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जय भोले नगर येथे राहणारे विजय पांडे हे आपल्या कुटुंबासह जगन्नाथ पुरी येथे दर्शनासाठी गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरी चोरी करून तब्बल 16 लाख 52 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने तपास करत आरोपी इजहार अन्सारी याला अटक केली आहे तर त्याच्या फरार तीन साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे. आरोपीकडून 1 लाख 35 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.