चंद्रपूर: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णय होळी आंदोलनात शेतकऱ्यांचा संताप; शासनाला अल्टिमेटम
अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ९ आणि १० ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या शासननिर्णयातील अन्यायकारक तरतुदींचा निषेध करत आज दि १६ ऑक्टोबर ला १२ वाजता शेतकरी संघटनेतर्फे राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “शासन निर्णय होळी आंदोलन” करण्यात आले.आंदोलनादरम्यान शासननिर्णयाची प्रतीकात्मक होळी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, हेक्टरमागे किमान ५० हजार रुपयांची मदत तत्काळ जाहीर करावी आदी मागण्या करण्यात आल्या.