जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे एका जुन्या प्रकरणातील ‘केस’ मागे घेण्याच्या कारणावरून संशयित आरोपींनी ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या मुलाला शेताच्या बांधावर धमकावून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता पती-पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.