नागपूर ग्रामीण: भरधाव टाटा पिकअपच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
: सावळी मार्गावर शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मालवाहू टाटा पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात आकाश विठ्ठल पिंपळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.आकाश शेतातील विहिरीचे काम पाहून दुचाकीने घरी परतत होता. दरम्यान, समोरून येणाऱ्या भरधाव टाटा पिकअप ट्रकने त्याला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक पोलला धडकून उलटली.