अकोला शहरातील वाशीम बायपास रोडवरील गंगानगर परिसरात शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारत एका जुन्या टायरच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली. बाळापूर येथील रशीद भाई यांच्या मालकीच्या या दुकानातील मोठ्या प्रमाणात टायर जळून खाक झाले असून नुकसानीचे प्रमाणही मोठे असल्याची माहिती समोर येतेय. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मनपाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली .