परभणी कडून हिंगोली कडे जाणारी कळमनुरी आगाराची बस क्रमांक एमएच 13 सीयू 8343 ही बस औंढा नागनाथ येथील बस स्थानकापासून दिनांक 15 नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पुढे हिंगोली कडे जात असताना बस स्थानकाच्या थोड्या पुढे अंतरावर एका मद्यधुंद व्यक्तीने अचानक बस पुढे येऊन चालकास बस थांबवण्या सांगितले व मी तिकीट काढलेले आहे हे बघा तिकीट असे म्हणाला परंतु सदरील तिकीट हे दुसऱ्या बसचे होते हे तिकीट दुसऱ्या बसचे आहे असे वाहक म्हणताच त्या मद्यधुंद व्यक्तीने वाहक व चालकास शिवीगाळ केली