जळगाव शहराला सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्याच्या उद्देशाने 'माझे शहर माझी जबाबदारी' या संकल्पनेतून शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता सागर पार्क परिसरात एका विशेष 'स्वच्छता वॉक'चे आयोजन करण्यात आले होते. एस.डी. फाउंडेशन आणि चिन्मय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत परिसरातील कचरा साचण्याचे ठिकाणे शोधून ते कायमस्वरूपी बंद करण्यात आले.