मानगाव: मोरबा विभागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
Mangaon, Raigad | Nov 15, 2025 आज शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मोरबा दहिवली कोंड पालकरवाडी येथील राष्ट्रवादी आणि भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. या वेळी अतिफ टाके, साहिल सतवे, हेमंत पालकर, बासित बंदरकर, हुजेब टाके, रमेश कोळी, संदेश मांडवकर,अमाद बंदरकर, सोहम जाधव ओमकार जाधव, राजबा जाधव इत्यादिनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशा वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा जिल्हा अधिकारी विपुल उभारे, तालुका प्रमुख महेंद्र मानकर, तशेच तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक इत्यादी उपस्थित होते.