आज दिनांक 6 डिसेंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे कारण याच दिवशी म्हणजे 6डिसेंबर रोजी बाबासाहेब यांचे महापरिनिर्वाण झाले आणि ज्या माणसाने या भारत देशाला पवित्र असे संविधान दिले त्यामुळे या महामानवाला आज ही अभिवादन करण्यात आले आहे.