मोताळा: शेलापुर येथे एक्का बादशहा जुगारावर पोलीसांचा छापा ६ जुगाऱ्यांना अटक
मोताळा तालुक्यातील शेलापूर शिवारातील १९ सप्टेंबर रोजी एक्का बादशहा जुगार अड्ड्यावर बोराखेडी पोलिसांनी छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत ताशपत्ते व अन्य साहित्यासह २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. याप्रकरणी विकास बबन जैस्वाल, प्रदीप सुभाष भोपळे, प्रदीप मनोहर शिवदे, ईश्वरदास भिकाजी बावस्कर, गजानन लक्ष्मण नंदाने व प्रदीप जनार्धन बावस्कर यांना ताब्यात घेऊन बोराखेडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.