सातारा: राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद,लोकमत कॅम्पस क्लब व दृष्टी आर्चरी अकॅडमी यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन
Satara, Satara | Oct 19, 2025 सातासाताऱ्यातील वाढे फाटा येथे भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेला राज्यभरातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकमत कॅम्पस क्लब आणि दृष्टी आर्चरी अकॅडमी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे निवड झालेल्या खेळाडूंना आता राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे.