नागपूर ग्रामीण: कारखान्याचा कचरा पेटवल्याने खळबळ; प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप
डिफेन्स रस्त्यावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास कारखान्यातील घातक कचरा अज्ञाताने पेटवून दिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. प्लास्टिक आणि रासायनिक कचऱ्यामुळे डिगडोह परिसरात काळोख दाटून नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागला. सुरुवातीला आग डम्पिंग यार्डमध्ये असल्याचे समजले, मात्र ती १०० मीटर अंतरावर रस्त्यालगत होती.