खंडाळा: इन्स्टाग्रामवरून जाळ्यात ओढून खंडणीसाठी अपहरण; शिरवळ पोलिसांची तीन आरोपींवर कारवाई
सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या धक्कादायक प्रकरणात इन्स्टाग्रामवरून ओळख करून एका तरुणाला जाळ्यात ओढून त्याचे अपहरण करून मारहाण तसेच खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात तिघा आरोपींना शिरवळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सातारच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.