खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव शिवारात बिबट्या असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून बिबट्याचा आवाज परिसरात ऐकू आल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांच्या जीवितास धोका टाळण्यासाठी रात्रीचा वीजपुरवठा दिवसा देण्याची मागणी जोर धरत आहे.दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना सुरक्षितपणे शेतीकाम करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे