पनवेल: नितलस परिसरात सुमारे ४ कोटी ८८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
Panvel, Raigad | Oct 15, 2025 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नितळस येथे ३ कोटी ४ लाख ९९ हजार रुपयांच्या निधीतून 'इजिमा २१ ते नितळस रस्ता काँक्रिटीकरण' करण्यात येणार आहे. तसेच, आज बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून १६ लाख ८६ हजार ४३४ रुपयांच्या निधीतून व्यायामशाळेचे बांधकाम होणार आहे. याशिवाय, पनवेल महानगरपालिकेच्या १ कोटी ६६ लाख ४७ हजार ६५१ रुपयांच्या निधीमधून किरवली येथील भरत पाटील यांच्या घरापासून ते जितेंद्र तरे यांच्या घरापर्यंत आणि भरत पाटील यांच्या घरापासून ते मंदिरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या सर्व विकास कामांचे भूमिपूजन बुधवारी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.