बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे शेतात जात असताना एका महिलेला व त्यांच्या पतीला अडवून पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. उषा शिवाजी फाळके (वय ४०) यांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव गोपाळ जाधव, बाबासाहेब महादेव जाधव, गणेश महादेव जाधव, अर्चना महादेव जाधव आणि गौळण महादेव जाधव यांनी इतर साथीदारांसह मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आला. सध्या त्यांच्यावर बीड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींना तात्काळ अटक करावी आणि तक्रार असूनही