भंडारा जिल्ह्यातील वलनी येथे आयोजित श्रीमद भागवत कथेच्या मंगलप्रसंगी विश्व हिंदू परिषद, जिल्हा भंडारा यांच्या वतीने प्रसिद्ध कथावाचक श्री. येणिरामजी भट महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. १० जानेवारी रोजी सायं. ६ वाजता दरम्यान या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री राकेश सेलोकर, भंडारा विभाग सहमंत्री प्रकाश पांडे, जिल्हा अध्यक्ष अनिल डोंगरवार, जिल्हा संघटन मंत्री श्रीकांत सावले, जिल्हा सहमंत्री कृष्णा हत्तीमारे...