चिखलदरा: तालुक्यातील खुटिदा,सिमोरी,सुमिता गावांचे आमरण उपोषणाचा दुसरा दिवस;रस्ता,पूल व ऊर्जा सुविधांसाठी आंदोलन तीव्र
चिखलदरा तालुक्यातील खुटिदा, सिमोरी आणि सुमिता या दुर्गम गावांतील नागरिकांनी आपल्या मूलभूत सुविधांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि सागरी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दिनांक १६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून,शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ ठामपणे आंदोलनावर बसले आहेत. आणि रस्ता पुल व ऊर्जा सुविधांसाठी आंदोलन तीव्र करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी दुपारी ४ वाजता प्रसार माध्यमांना सांगितले.