नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद अजूनही प्रलंबित असतानाच, उरण तालुक्यातील जासई परिसरात ‘राष्ट्रीय लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे फलक झळकू लागले आहेत. विमानतळ सुरू होण्याआधीच अधिकृत नाव जाहीर करावे, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे २२ डिसेंबर रोजी आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दि. बा. पाटील यांच्या नावाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.