आष्टा भिलवडी रस्त्यावर हॉटेल सरपंच जवळ अचानक कोल्हा आडवा वाल्याने तोल जाऊन झालेल्या दुचाकी अपघातात ओंकार नंदकुमार माने (वय २७ रा. खंडोबाची वाडी तालुका पलूस ) या तरुणाचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता घडली. ओंकार माने हे आष्ट्याकडून भिलवडीकडे आपल्या दुचाकीवरून येत असताना. रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतातून अचानक एक कोल्हा बाहेर आला. त्या कोल्ह्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ओंकार याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी त्याच्या अंगावरून गेली. या गंभीर अपघाता