एमआर लसीकरण मोहीमेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
1.7k views | Karanja, Washim | Sep 16, 2025 कारंजा लाड येथे दि.१६, सप्टेंबर रोजी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत दारुल उलुम जकरिया तजवीदुल कुरआन मदरसा येथे एमआर लसीकरण मोहीम पार पडली. ५ ते १५ वर्षे वयोगटातील ४८ विद्यार्थ्यांपैकी ४४ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. हा कॅम्प तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नांदे व तालुका आरोग्य सहाय्यक श्री. भिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला. या मोहिमेत डॉ. हितेश सुर्वे, डॉ. हेमा मुंदडा, प्रतिक जाधव, शिरीन परवीन शेख रशीद, वर्षा चव्हाण व ममता ताकसांडे, श्री. सचिन मुंदे, श्री. योगेश चौधरी, श्री. अब्दुल करीम अब्दुल रज्जाक, विठ्ठलभाऊ अवताडे तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.