पेण नगरपालिकेवर भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) युतीतर्फे प्रीतम ललित पाटील या १४,२७३ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी 'आम्ही पेणकर विकास आघाडी' गटाच्या रिया धारकर यांचा ८,४१२ मते मिळवून पराभव केला. तर काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांना केवळ ६८७ मते मिळाली. यावेळी मात्र सर्व पक्षांनी आपापली खाती उघडली. एकूण २४ जागांपैकी भाजपच्या १२ जागा, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या ५ जागा अशा एकूण १७ जागांवर युतीला बहुमत मिळाले.