पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार वेगाने सुरू आहे दिनांक 8 जानेवारी रोजी झालेला प्रचार फेरीमध्ये चिंचवड मतदार संघाचे आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित राहून उमेदवारांचा उत्साह वाढवला घरोघरी जाऊन भेटी प्रत्यक्ष संवाद आणि विकास कामांच्या जोरावर भाजपाचा प्रचार केंद्रित असल्याचे पाहायला मिळाले