नांदगाव खंडेश्वर: पारधी बेडा ओंकारखेडा येथे शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात विळ्याने मारून केले जखमी
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पारधी बेडा ओंकारखेडा येथे शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात डोक्यावर विळा मारून जखमी केल्याची घटना २१ सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी घडली आहे. याबाबतीत प्रीतम जैतून भोसले यांनी 21 सप्टेंबरला एक वाजून पंधरा मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी सुक्राम नैराश पवार राहणार पारधी बेटा ओंकारखेडा याचे वर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. यातील फिर्यादी व आरोपी हे नात्याने....