जळगाव जामोद: अकोला येथील कॉटन चौकातील भुयारी गटारात वाहून गेलेला व्यक्ती मानेगाव पूर्णा नदी पात्रात मृत आढळला
अकोला येथील कॉटन चौकातील भुयारी गटारात वाहून गेलेल्या व्यक्ती दिनांक 30 सप्टेंबर रोजी मानेगाव पूर्णा नदी पात्रात मृत अवस्थेत आढळला. दिनांक 27 सप्टेंबर रोजी अकोला येथील कॉटन चौकातील भुयारी गटारात एक व्यक्ती वाहून गेला ही माहिती पोलीस व आपत्ती व्यवस्थापनाला देण्यात आली होती त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला परंतु ती आढळली नाही.