महाड: लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत रास्तभाव धान्य दुकानातुन धान्य उचल करावी – रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे
Mahad, Raigad | Oct 15, 2025 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्तभाव धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येते. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी दि.२० ऑक्टोबर २०२५ पर्यंत रास्त भाव धान्य दुकानातुन धान्याची उचल करावी, असे आवाहन आज बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी केले आहे.