खंडाळा: धनगरवाडी येथे कंटेनरला टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडी ता. खंडाळा येथे कंटेनरला टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीसांनी सांगितले की, गुरूवार दि. 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजता धनगरवाडी ता. खंडाळा येथे सदरचा अपघात घडला आहे. अपघातात सत्यवान पांडुरंग गलांडे (रा.चिंतामणी नगर, सांगली) हा जागीच ठार झाला.