वसई: शास्त्रीनगरच्या सिल्व्हर सॅन्ड सोसायटीत राहणाऱ्या माधवराव वाडीकर यांच्या घरी चोरी
Vasai, Palghar | Apr 18, 2024 शास्त्रीनगरच्या सिल्व्हर सॅन्ड सोसायटीत राहणाऱ्या माधवराव वाडीकर (५०) यांच्या घरी सोमवारी दुपारी घरफोडी झाली. चोरट्याने घराच्या किचनमधील खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून काचेचे स्लाईडिंग सरकवून त्यावाटे घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातून १ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र, ६० हजारांचे कानातले व ३५ हजारांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. माणिकपूर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. माणिकपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.